Table of Contents
नीट युजीच्या परिक्षांदरम्यान घडलेल्या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हाहाकार माजला होता आणि त्यामुळे नीट पिजीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांची प्रतीक्षा होती. अशातच आता ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रांमध्ये होणार असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबतची अधिसूचना एनबीईएमएसकडून जारी करण्यात आली आहे. यासंबंधीचे एक परिपत्रकसुद्धा आता जारी करण्यात आले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने परीक्षेची ही तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता नीट पीजी २०२४ (NEET PG 2024) परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नीट पीजी २०२४ (NEET PG 2024) ही परीक्षा २३ जून २०२४ रोजी पार पडणार होती. मात्र, परीक्षेच्या अगदी एक दिवस आधी परीक्षा पुढे ढकलली गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
या स्टेप्स वापरून पहा पीजीचं पत्रक
स्टेप 1: प्रवेशपत्रक डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या natboard.edu.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2: आता होमपेजवर तुम्हाला पब्लिक नोटीस ऑप्शन दिसेल.
स्टेप 3: पब्लिक नोटीस मध्ये नीट पीजी परीक्षेसंदर्भातील पर्याय निवडा.
स्टेप 4: तो निवडताच नवा पर्याय उपलब्ध होईल
स्टेप 5: यानंतर तुम्ही नीट पीजी परीक्षेबाबत सुचनापत्रक दिसेल.
NEET PG 2024 प्रवेशपत्र कधी मिळणार?
नीट पीजी २०२४ (NEET PG 2024) परीक्षेच्या नवीन तारखा आता जारी झाल्या असून परिक्षेसाठीची प्रवेशपत्रके देखील पुन्हा जारी केली जाऊ शकतात. परीक्षा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी हे प्रवेशपत्र उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहे. हे प्रवेशपत्र अधिकृत संकेस्थळावरून डाउनलोड करता येईल.
NEET परीक्षेतील गोंधळामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला
दरम्यान, नीट पीजी २०२४ ही परीक्षा २३ जून रोजी होणार होती. मात्र राज्यात नीट युजी परीक्षेमध्ये घडलेल्या पेपर लीक आणि गोंधळामुळे झालेल्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नीट परीक्षेतील गोंधळामुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले होते. देशभरातील विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे सरकारने विचारपूर्वक निर्णय घेत ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.
Add Comment