Table of Contents
कोकणात जाण्यासाठी अनेक चाकरमानी दरवर्षी शिमगा, गणेशोत्सव आणि इतर सणांच्या दिवशी गर्दी करतात. कोकणात जायचं म्हटलं की ज्याला कन्फर्म तिकीट मिळालं तो भाग्यवान मानावा लागतो. एकीकडे असणारा मुंबई गोवा महामार्ग आणि आपली लाडाची कोकण एक्स्प्रेस (Kokan Express) हे दोनच पर्याय मुख्यत्वे कोकणात जाणारे लोक गृहीत धरतात. पण मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था आणि कमी पडणाऱ्या कोकण एक्स्प्रेस (Kokan Express) यामुळे बरेच जण नाराज झाले होते.
पण, याच नाराज झालेल्या चाकामान्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. मध्या रेल्वेप्रमाणे आता पश्चिम रेल्वे भागातसुद्धा आज पासून कोकणामध्ये जाण्यासाठी नियमित आठवड्यातून दोनदा ट्रेन (Kokan Express) सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानक इथपर्यंत ही ट्रेन धाव घेणार आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरात राहणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 7 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मुंबईत आज म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी या ट्रेनच बोरिवली स्थानकावर उद्घाटन करण्यात आलं. पश्चिम रेल्वेच्या अधिकार्याच्या माहितीनुसार, कॉर्ड लाइन नसताना, त्यांना त्यांच्या सिस्टीममधून कोकणकडे जाणाऱ्या गाड्या (Kokan Express) चालवण्यासाठी वसई रोडवर उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशा बदलावी लागेल, जी वेळ घेणारी असेल आणि इतर गाड्यांच्या वेळांवर परिणाम होऊ शकतो.
काय असेल नव्या Kokan Express च वेळापत्रक?
वांद्रे-मडगाव ही ट्रेन (Kokan Express) आठवड्यातून दोनदा धावणार आहे. मडगाव स्थानकावरून वांद्रे स्थानकापर्यंत दर मंगळवारी आणि गुरुवारी ही गाडी सकाळी 7.40 वाजता सुटेल आणि रात्री 11.40 वाजता पोहचेल. तर, दर बुधवार आणि शुक्रवारी ही गाडी वांद्रे स्थानकावरून मडगाव स्थानकापर्यंत जाईल. ही ट्रेन सकाळी 6.50 ला सुटेल आणि मडगावला रात्री 10 वाजता पोहचेल.
ही ट्रेन (Kokan Express) एकूण 20 डब्यांची असून वांद्रे-मडगाव या ट्रेन एकूण 13 स्टॉप घेणार आहेत. यात बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी या स्थानकांचा समावेश आहे.
Add Comment