केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून ७वा अर्थसंकल्प, तर मोदी सरकारच्या ३.० टर्ममधील पहिला अर्थसंकल्प काल सादर केला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पात सरकारकडून शेती, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित उपाययोजनांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचे निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे केंद्रसरकार यंदा २० लाख तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ३ टक्के व्याजावर १० लाख कर्ज विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच महिलांना नोकरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वसतिगृह बांधणे आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम राबवणे अशा प्रकल्पांना महत्त्व देण्यात येणार आहे.
दरवर्षी अर्थसंकल्पात जरी विविध योजना जाहीर केल्या जात असल्या, तरी या योजनांमुळे किंवा नव्या निर्णयांमुळे देशात नेमक्या कोणत्या वस्तू किंवा सोयी-सुविधा महाग किंवा स्वस्त झाल्यात यावरही सामान्य नागरिकांच्या नजरा टिकून असतात. त्यामुळे यावेळी नेमक्या कोणत्या गोष्टी महाग झाल्यात आणि कोणत्या स्वस्त हे आपण जाणून घेऊया.
‘या’ गोष्टींचे दर कमी होणार:
भविष्यात स्मार्टफोन आणि चार्जर स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण, मोबाईल फोन आणि चार्जरवरील सीमाशुल्क सरकारने १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
ई-कॉमर्सवरील टीडीएस आता १ टक्का नाही तर ०.१ टक्के असणार आहे.
सोने आणि चांदी सुद्धा आता सीमाशुल्क ६ टक्क्यांनी घटवल्यामुळे स्वस्त होणार आहे.
कर्करोगावरील उपचारांसाठी वापरली जाणारी ३ प्रमुख औषधंसुद्धा आता स्वस्त होणार आहेत.
सोलर पॅनलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही सामानावर देखील सूट मिळणार आहे.
प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात ६.४ टक्क्यांची घट केल्यामुळे आता तेही काहीसे स्वस्त होणार आहे.
माशांच्या खाद्यावरील सीमाशुल्कात ५ टक्क्यांनी घट केल्यामुळे, आता मासे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
लिथियम बॅटरी, विजेची तयार, चामड्याच्या वस्तू आणि विजेवर चालणारी वाहनं स्वस्त होणार आहेत.
‘या’ गोष्टी महागणार:
काही टेलिकॉम उपकरणांची आयात महागणार आहे.
पीव्हीसी फ्लेक्स बॅनरची आयात देखील महागणार आहे.
इक्विटी गुंतवणूक कर आता १५ ऐवजी २० टक्के करण्यात आला आहे.
एका वर्षापेक्षा जास्त वेळ ठेवण्यात आलेल्या शेअर्सवर आता १२.५ टक्के कर भरावा लागणार आहे.
विमान प्रवास, मोठ्या छत्र्या आणि सिगारेट देखील आता महाग होणार आहे.
Add Comment