Table of Contents
राज्यात जस जशी विधानसभा निवडणुक जवळ येतेय, तस तसे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. अशातच आज, भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठा ठाकरे गटाचे सर्वेसर्वा (Shivsena UBT) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांना थेट कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद व शकील यांच्या रांगेत बसवले आहे. उद्धव ठाकरेंना त्यांचा तिसरा साथीदार त्यांनी म्हटले आहे.
आज शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील महायुतीतील नेत्यांना ‘गुंडांची टोळी’ असे संबोधले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून उबाठा ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याचा पार्टनर असा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
दाऊदचा पार्टनर उद्धव ठाकरे: Nitesh Rane
नितेश राणे म्हणाले, “दाऊद व शकील यांचा तिसरा पार्टनर उद्धव ठाकरे आहे. जिहादी कारवाया उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चाललेलं आहेत का ? जिहाद्याच्या हातात मशाल चिन्ह देऊन एका हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन भाजपा सोबत लढून जिंकू असं वाटत असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे शिवबंधन हिरव्या रंगाचे बांधायला लागलं आहे. भाजपशासीत राज्यात लोकशाही नसती तर हा टिनपाट अजून जेल मध्ये असता. आणीबाणीबाबत काँग्रेसला विचार त्यामध्ये काँग्रेसने पीएचडी केलेली आहे,” असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. म्हणाले, “ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतला टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या. त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे सध्याची एक टोळी आहे, आणि त्या टोळ्याचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत. त्या टोळ्या चालवत आहेत आणि त्या टोळ्या आपल्या सरकार टिकवण्यासाठी खालच्या गुड्यांच्या टोळ्या पोसतात. मग आमदार खासदार यांच्यावरचे हल्ले, लुटालुट, खून, लूटपाट सगळं काही चालतं, ” असे ते म्हणाले होते.
Add Comment