Table of Contents
लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) पार पडल्यानंतर आता १८व्या लोकसभा अध्यक्षपदासाठीची (Loksabha Speaker Election) देखील निवडणूक झाली, आणि यावेळी पुन्हा एकदा ओम बिर्ला (Om Birla) यांची लोकसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. आवाजी मतदानाच्या माध्यमातून हे मतदान करण्यात आले तर, एनडीएचे (NDA) ओम बिर्ला बहुमत मिळाल्याने ते पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदी आता दिसून येणार आहेत.
विरोधी पक्षाकडून के. सुरेश (K. Suresh) यांचे नाव पुढे करण्यात आले होते. तर एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हंगामी अध्यक्ष भर्तुहरी मेहताब (Bhartuhari Mehtab) यांनी आवाजी मतदानाचा निर्णय जाहीर करत, ओम बिर्ला यांची निवड झाल्याचे सांगितले.
Om Birla दुसऱ्यांदा ठरले लोकसभेचे अध्यक्ष
लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीए आघाडीकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ घटक पक्षांनी मांडला होता. ओम बिर्ला यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, ललन सिंह, जितनराम मांझी, चिराग पासवान, कुमारस्वामी, अनुप्रिया पटेल, सुनील तटकरे, अन्नपूर्णा देवी यांनी अनुमोदन दिले होते.
तर, इंडिया आघाडीकडून म्हणजेच विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव शिवसेना उबाठा सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला होता. या प्रस्तावाला विरोधी पक्ष नेते एन. के. प्रेमचंद्रन, पंकजा चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले होते.
स्वातंत्र्य काळानंतर तिसरी निवडणूक
इंडिया आघाडीच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीला सत्ताधारी पक्षाने धुडकावून लावल्यामुळे इंडिया आघाडीने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिला. स्वातंत्र्य काळानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, त्यांना नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि किरण रिजिजू यांनी आसनापर्यंत पोहचवले.
नरेंद्र मोदींना १७व्या लोकसभेच्या कार्यकाळात ओम बिर्ला यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्वक निर्णयांवर प्रकाश टाकला. राहुल गांधी यांनीही ‘लोकसभा हे देशातील जनतेचं आवाज मांडणार सभागृह असून लोकसभा अध्यक्ष या आवाजाचे रक्षणकर्ते आहेत,’ असे म्हणत ओम बिर्लांचे अभिनंदन केले.
Add Comment