Table of Contents
१५ ऑगस्ट हा दिवस सर्वांच्या जवळचा दिवस. याच दिवशी भारत ब्रिटिशांच्या जाचातून मुक्त झाला होता. त्यानंतर तेव्हापासून १५ ऑगस्ट (15 August) हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात दरवर्षी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे आणि त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण १५ ऑगस्ट (15 August) रोजी केले जाते. पण, हा दिवस भारतीयांच्या आणि खासकरून क्रिकेटप्रेमींच्या अजून एका प्रसंगामुळे स्मरणात आहे, आणि तो प्रसंग म्हणजे भारताच्या दोन स्टार क्रिकेटपटुंनी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती.
टीम इंडियाचा माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या सहकाऱ्यांसह भारताला आयसीसीच्या तिन्ही स्पर्धामध्ये विजय मिळवून दिला. मात्र, ४ वर्षांपूर्वी ठीक याच दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट (15 August) रोजी त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. धोनीने स्वातंत्र्य दिनी निवृत्ती घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांना दरवर्षी १५ ऑगस्ट (15 August) या दिवशी त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीची आठवण होते. पण या दिवशी फक्त त्यानेच नव्हे तर अजून एका क्रिकेटपटुने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
महेंद्रसिंह धोनी याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तर त्याच्यामागोमाग सुरेश रैना या त्याच्या मित्राने देखील क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा धोनी आणि रैना यांच्यातील ऑन आणि ऑफ फिल्ड असणाऱ्या मैत्रिला जाणतो. रैनाने प्रत्येकवेळी धोनीची साथ दिली आहे, आणि निवृत्तीतही त्याने त्याची साथ सोडली आहे. पण, धोनी आणि रैनाची मैत्री सुरू तरी कशी झाली? याचा किस्सा नेमका काय? याबद्दल सुरेश रैनाने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले आहे.
माझ्या आणि धोनीच्या मैत्रीची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेदरम्यान झाली होती. २००५ साली झालेल्या फरिदाबाद येथील सामन्यात आमची मैत्री झाली. धोनीच्या या सामन्यातील निर्भिड आणि बेधडक खेळीने मी प्रभावित झालो. आमची मैत्री इथूनच सुरू झाली. त्यानंतर आम्ही दोघेही टीम इंडियाचा भाग झाली. दोघांनी टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले. आम्हा दोघांची मैत्री वाढली, असे सुरेश रैना सांगतो.
निवृतीसाठी 15 August चीच निवड का केली?
दोघांनी एकाच दिवशी निवृत्ती का घेतली? या प्रश्नाचे उत्तर देताना सुरेश रैना याने एका मुलाखतीत म्हटले होते की, “आम्ही आधीच १५ ऑगस्टला निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. धोनीचा जर्सी नंबर ७ आणि माझा ३. आमच्या दोघांच्या जर्सीचा नंबर जोडल्यास तो ७३ असा होतो. तसेच १५ ऑगस्ट २०२० रोजी भारताला स्वातंत्र्य होऊन ७३ वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे निवृत्तीसाठी यापेक्षा आणखी कोणताही चांगला दिवस नसता”, असं सुरेश रैनाने म्हटंल.
Add Comment