Table of Contents
सोनं हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. विविध सोहळ्यांसाठी किंवा एक आर्थिक गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकांकडून सोनं विकत घेतलं जात. देशात प्रत्येक राज्यात सोन्याचे वेगवेगळे दर वेगवेगळे आहेत. पण येत्या काळात संपूर्ण देशात One Nation One Rate पद्धत लागू करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.
सोन्या – चांदीच्या किंमती समान करणे, स्थानिक कर, लॉजिस्टिक्स खर्च आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सोन्याच्या किमती बदलतात. One Nation One Rate धोरणा अंतर्गत राष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीद्वारे सोन्याचे दर निश्चित करण्यात येणार आहेत आणि याच दरात संपूर्ण देशात सोने विकले जाईल.
जेम अँड ज्वेलरी कौन्सिल (GJC) ने One Nation One Rate हे धोरण लागू करण्याआधी देशातील अनेक मोठ्या सोनारांचे मतं घेतले आहे. अनेक सोनारांच्या मते, हे एक मोठे पाऊल आहे. जे सोने व्यापाराला चालना देईल. तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर या धोरणाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
One Nation One Rate पॉलिसीचे फायदे
- या धोरणामुळे सोन्याच्या किंमतीतील पारदर्शकता येणार आहे. ग्राहकांच्या मनात देशभरातील सोन्याच्या किंमतीत यामुळे संभ्रम राहणार नाही. तसेच सोन्याच्या किंमती समान असल्यामुळे देशात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही.
- One Nation One Rate मुळे सर्व ग्राहकांना देशाच्या कोणत्याही भागात समान वागणूक दिली जाईल. यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक भेदभाव होणार नाही आणि व्यापार सुरळीत होईल.
- सोन्याच्या समान किंमतीमुळे सोन्याचा बाजार अधिक कार्यक्षम होईल. त्याचप्रमाणे किंमतींवरून ग्राहक आणि ज्वेलर्स यांच्यातील होणारे वादही बरेच कमी होतील.
- संपूर्ण देशात सोन्याची एकच किंमत असल्यामुळे सोन्याच्या किंमतीत घट होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना खूप स्वस्त आणि वाजवी दरात सोने खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे मनमानी दर आकारणाऱ्यांवर पण वचक राहील आणि त्यांना गैरप्रकार करण्यापासून अडवता येईल.
- त्याचप्रमाणे देशातील समान दरामुळे सोन्याच्या व्यापाऱ्यांसाठी पण समान स्पर्धेचे वातावरण निर्माण होईल.
देशातील राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही लोकांना सोनं हा एक महत्त्वाचा आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय वाटतोय. देशाच्या राजधानीत दिल्लीत सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर ७५ हजार आहे, तर १ किलो चांदीचा दर ९४ हजार रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीत, मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा दर सध्या ७१,८०० आहे. तर १ किलो चांदीचा दर ९९ हजार ९९० रुपये आहे.
Add Comment