Table of Contents
जिथे एकीकडे भारतीय सरकार नवनव्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे. तिथे दुसरीकडे बायजूस (BYJU’s) आणि पेटीएमसारख्या (Paytm) यशस्वी कंपन्या रसातळाला जाताना आपण यावर्षी पहिल्या. आरबीआयने घेतलेल्या निर्णयांमुळे आणि केलेल्या कडक कारवाईमुळे भारतातील अनेक फिनटेक (Fintech) कंपन्यांना मोठ्या तोट्याचा सामना करावा लागला. २०२४ साली आरबीआयने (RBI) पेटीएमवर कारवाई करत पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली. यामुळे पेटीएम कंपनीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
आरबीआयच्या या निर्णयामुळे पेटीएमला खूप मोठा झटका बसला. या एका प्रसंगामुळे कंपनीने आपले अनेक ग्राहक गमावले. त्यामुळे पेटीएम आता पुन्हा एकदा आपली जुनी ओळख मिळवण्यासाठी आणि पुन्हा फिनटेक क्षेत्रात आपले स्थान कायम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबाबत एका कार्यक्रमात बोलत असताना पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अत्यंत भावुक विधान केले आहे. आता ते विधान कोणते? घेऊया जाणून.
Paytm चे सीईओ म्हणाले – फार दुःखद घटना
एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा अत्यंत भावुक झाले. पेटीएमचे संस्थापक म्हणाले, संस्थापक असल्यामुळे पेटीएम कंपनी माझ्यासाठी मुलीसारखी होती. ती सतत टॉप करत होती. पण, एका प्रवेश परीक्षेला जाताना तिचा भीषण अपघात झाला, आणि आता ती आयसीयूमध्ये आहे. हि माझ्यासाठी एक अत्यंत भावनिक घटना होती. एक कंपनी म्हणून आमची झपाट्याने वाढ होत होती. पेटीएम प्रगतीच्या मार्गावर होते. पण, या अपघातामुळे त्याचे फार हाल झाले.
लिस्टेड कंपनी चालवणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी
या कार्यक्रमात ते पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे मिळालेल्या धड्याबद्दल देखील ते बोलले. ते म्हणाले कि, वैयक्तिकरित्या हा माझ्यासाठी एक मोठा धडा आहे. आपली जबाबदारी पार पडताना आपण प्रोफेशनल राहणे अत्यंत गरजेचे आहे. पण, तरीही या धक्क्यानंतर आम्ही मोठी स्वप्ने पाहत आहोत, आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न देखील करत आहोत. आता आम्हाला पेटीएमला १०० अब्ज डॉलरची कंपनी बनवायची आहे. तसेच तिला जागतिक स्तरावरसुद्धा नावलौकिक मिळवून द्यायचे आहे.
पेटीएमचे संस्थापक म्हणाले की, लिस्टेड कंपनी हि एक मोठी जबाबदारी आहे. आपल्याला अनेक लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरावे लागते. पेटीएम आता त्या धक्क्यातून सावरण्याचा आणि पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी पुन्हा एकदा युपीआय (UPI) व्यवसाय स्थिरतेकडे वाटचाल करत आहे.
Add Comment