Table of Contents
संपूर्ण देशात सध्या पॅरिस ऑलिम्पिक हा चर्चेचा विषय ठरत आहे. या स्पर्धेत सुरू असणारा प्रत्येक खेळ भारतीय उत्सुकतेने पाहत आहेत. एकीकडे मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघ पुरूष हा देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
अशातच आता, स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडूने भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून दिलेले आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर स्वप्नीलने तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राला पहिले ऑलिंपिक पदक जिंकून दिले आहे. स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याच्या विजयाने संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच त्याचे कौतुक करण्यासाठी राज्यसरकारने त्याचे जंगी स्वागत करण्याचा बेत आखला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवणारा स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) हा मूळचा कोल्हापुरातील आहे. त्याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये १ ऑगस्ट रोजी कांस्यपदक जिंकले आहे. त्याच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्याला राज्यसरकारतर्फे एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
Swapnil Kusale बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या आई-वडिलांना फोन केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वप्नील हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे.
ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन.शिंदे यांनी पुढे म्हटले की, स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वप्नीलच्या पालकांशी संपर्क साधला. फडणवीसांनी म्हटले की, १९५२ नंतर स्वप्नीलने वैयक्तिक पदक मिळवून दिलं. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वप्नील परत आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वप्नीलच्या घरच्यांशी फोनवरून संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले. फडणवीसांनी म्हटले की, 1952 नंतर स्वप्नीलने वैयक्तिक पदक मिळवून दिलं. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वप्नील परत आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे.
त्याचप्रमाणे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीहीस्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले आहे. हसन मुश्रीफ यांनी स्वप्नील कोल्हापुरात आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढली जाईल, असेही म्हटले आहे.
Add Comment