Table of Contents
बॉलिवूडमधील बरेच कलाकार त्यांच्या फॅशनमुळे, वक्तव्यामुळे किंवा मग डाएट आणि वर्कआऊटमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशाच एका कारणामुळे एकेकाळचा बॉलिवुडचा चॉकलेट बॉय असलेला आर माधवन (R Madhavan) सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. छोट्या भूमिका साकरत-साकरत मोठ्या पडद्यावरसुद्धा आपली छाप सोडणारे फार कमी कलाकार इंडस्ट्रीत आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे आर माधवन (R Madhavan). ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातील ‘मॅडी’च्या भूमिकेने त्याला घराघरात पोहचवले. त्यानंतर आर माधवनने अनेक भूमिका साकारल्या. अलीकडेच तो अजय देवगनच्या शैतान चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.
पण, सध्या आर माधवन त्याच्या एखाद्या आगामी चित्रपटामुळे किंवा कोणत्याही वक्तव्यामुळे नाही तर, त्याच्या व्हेटलॉसच्या डाएट प्लानमुळे चर्चेत आहे. आर माधवनच्या फॅट टू फिटच्या लूकने चाहत्यांना अचंबित केले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत आधीचा माधवन आणि आताचा माधवन यांच्यात खूप फरक दिसून येत आहे. पण, मग अभिनेत्याच्या या व्हेटलॉस मागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे वर्कआऊट न करता किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता फक्त २१ दिवसाच्या कालावधीत त्याने वजन कमी केले आहे.
R Madhavan ने सांगितला वजन घटवण्याचा फंडा
अभिनेता आर माधवन याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने २१ दिवसात वजन कसे कमी केले याचे सिक्रेट सांगितले आहे. एक्स मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत आर माधवनने लिहिले, “इंटरमिडेंट फास्टिंग करणे, 45-60 वेळा अन्न चांगले चावणे. रात्री उशीरा न जेवता दिवसातील शेवटचं जेवण संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी घेणे. सकाळी चालणे आणि रात्री चांगली झोप घेणे आणि यासोबत भरपूर द्रवपदार्थ घेणे. हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.”
त्यानंतर अभिनेता आर माधवन याने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो कर्ली टेल्सशी त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाला आहे की, त्याने कोणत्याही प्रकारचे औषधोपचार, व्यायाम, धावणे किंवा मग शस्त्रक्रियेच्या मार्फत वजन कमी केलेले नाही. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी 21 दिवसात मी आवश्यक तेवढंच अन्न खाल्लं, तसेच खूप प्रमाणत द्रव पदार्थांचे सेवन केले, असं त्याने सांगितलं. माधवचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला असून त्याच्या फिटनेसचं कौतुकही केलं जात आहे. अनेक जण हा डाईट प्लॅन फॉलो करणार असल्याचं कमेंट करुन सांगत आहे.
Add Comment