Table of Contents
पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराजांनी केल्यामुळे राज्यातील मुसलमानांकडून त्यांना अटक व्हावी. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे. अशातच आता रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे एका व्यासपीठावर दिसल्यामुळे जागोजागी याचा निषेध केला जात आहे. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये त्यांचा मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढून निषेध केला जात आहे.
रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी आपल्या एका प्रवाचनादरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर रामगिरी महाराजांची (Ramgiri Maharaj) प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, “बांगलादेशात कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत, अनेक बांगलादेशी भारताच्या सीमेवर उभे असून भारतात आश्रय मागत आहेत. बांगलादेशमध्ये जे घडलं ते उद्या आपल्या देशात घडायला नको, हिंदूंनी सुद्ध मजबूत राहायला हवं, आपण अन्यायाला प्रतिकार करायला हवं.”
रामगिरी महाराजांनी (Ramgiri Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर भागात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम रस्त्यावर उतरले. जमावाकडून रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे येवला आणि वैजापुरात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
Ramgiri Maharaj आणि मुख्यमंत्री एकाच कार्यक्रमात
एकीकडे रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात त्याच संध्याकाळी हजर होते. यावेळी मुख्यमत्र्यांनी रामगिरी महाराजांची स्तुती केली आणि रामगिरी महाराजांनी (Ramgiri Maharaj) अनेक कुटुंबांना दिशा दिली, असंही त्यांनी म्हटलं.
नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर दिसले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशिवाय भाजप नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विके पाटील, शिवनेचे नेत हेमंत गोडसे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज नाशिकमध्ये एकाच कार्यक्रमात आढळल्यामुळे येत्या काळात याचा काय परिणाम होतो ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Add Comment