News

घर घेण्याचे स्वप्न साकार होणार, मुंबईत MHADA Lottery निघणार

Mhada Lottery साठी असा करा अर्ज...

मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते. इथे प्रत्येक जण एक नवे स्वप्न उराशी बाळगून येतो. त्यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वतःचं घर असण्याचं. मुंबई ही देशातील मेट्रो सिटी मानली जाते. मुंबईसह राज्यातील इतर मेट्रो शहरात गेल्या काही वर्षात घरांचे भाव आस्मानाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकांचं घर खरेदी करण्याचं स्वप्न हे आता स्वप्नच राहील आहे. पण, मग अशाच लोकांना मुंबईत स्वतःचं घर मिळावं म्हणून सरकारतर्फे म्हाडाची लॉटरी (MHADA Lottery) काढली जाते.

यावेळीच्या म्हाडा लॉटरीत (MHADA Lottery) एकूण २०३० सदनिकांचा समावेश असणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. दरम्यान, या लॉटरीसाठी (MHADA Lottery) अर्ज दाखल करणाऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच या कागदपत्रांची यादी म्हाडाने (MHADA) आपल्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

म्हाडाने (MHADA) काढलेल्या या यादीसाठी चार उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात. आता ते कोणते ते पाहूया:

  • सहा लाख उत्पन्न असलेला अत्यल्प उत्पन्न गट
  • नऊ लाख उत्पन्न असलेला अल्प उत्पन्न गट
  • बारा लाख उत्पन्न असलेला मध्यम उत्पन्न गट
  • कमाल मर्यादा नसलेला उच्च उत्पन्न गट

MHADA Lottery साठी अर्जदारकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे:

MHADA Lottery साठी अर्जदारकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
Image Source: Image API

म्हाडा लॉटरीचा (MHADA Lottery) लाभ घेण्यासाठी एकूण सहा कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ती कागदपत्रे कोणती घेऊया जाणून.

  • अर्जदार हा विवाहित असल्यास त्याचे व त्याच्या पत्नीचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड.
  • अर्जदार विवाहित नसल्यास स्वतःचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड.
  • अर्जदाराने घटस्फोटासाठी अर्ज केला असल्यास किंवा तो घटस्फोटित असल्यास न्यायालयाकडून प्राप्त झालेली निकालाची प्रत (घटस्फोटाच्या केसच्या अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय घराचं ताबा मिळणार नाही.) आवश्यक आहे. तसेच अपील दाखल केला असल्यास त्याची प्रत द्यावी लागेल. तसेच अर्जदाराकडे डिक्री प्रमाणपत्र नसल्यास घराचे वितरण केले जाणार नाही.
  • अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच्या मागील २० वर्षाच्या कालावधीत किमान १५ वर्ष तरी महाराष्ट्रात वास्तव्य केलेले असायला पाहिजे. त्याबाबतचे अधिकाऱ्यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल प्रमाणपत्र असावे. तसेच डोमिसाइल प्रमाणपत्र हे २०१८ नंतर काढलेले असावे.
  • अर्जदार विवाहित असल्यास पती पत्नी दोघांचेही उत्पन्न असल्यास उत्पन्नाच्या पात्र गटानुसार दोघांचे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मधील आयकर विवरणपत्र असावे. तर कुटुंबाचा १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान काढलेला उत्पन्नाचा दाखला हवा.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment