Sports

Rohit Sharma: विश्वचषक विजेत्या टीमच वानखेडेवर जंगी स्वागत, आज होणार सत्कार

team india to reach new delhi on thursday morning 2024 07 13e5dabfd42d5aef6d5e4ecdf086baa0
Rohit Sharma आणि मुंबईतील इतर खेडाळूंचा होणार सत्कार

टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मोठ्या भारतात गुरुवारी आगमन झाले. या विश्र्वविजयी टीमचे दिल्ली आणि मुंबईत शहरात अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत यायला रवाना झाली. भारतीय संघाने मुंबईत पाऊल ठेवताच या विश्वचषक स्पर्धेतील विजयाचे वानखेडे स्टेडियमपर्यंत अगदी जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. विश्वविजेत्या या संघाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अलोट गर्दी जमा झाली होती.

भारतीय संघाची काल ओपन डेक बसमधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रचंड गर्दीमुळे ही बस अक्षरशः मुंगीच्या गतीने चालत होती. तसेच वानखेडे स्टेडियमवर या विजयी खेडळूंचा एक छोटेखानी सत्कार देखील करण्यात आला.

Rohit Sharma ने केला गणपती डान्स

Rohit Sharma ने केला गणपती डान्स
Image Source: Mint

या मिरवणुकीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा माध्यमांशी विश्वचषक जिंकण्याचा आनंद व्यक्त करताना म्हणाला, सगळ्यांना भरपूर खुशी आहे, कारण 17 वर्षानंतर ट्रॉफी आपल्या इंडियात आली आहे. त्यामुळे सगळ्यांना खुशी तर आहे. यावेळी रोहित शर्माला (Rohit Sharma) ट्वेन्टी-20 फॉर्मेटमध्ये तू आणखी काही काळ खेळायला पाहिजे होते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला, नाही, हा बरोबर टाईम होता, परफेक्ट टाईम होता. 2007 चा विश्वचषक पण स्पेशल होता, 2024 चा पण स्पेशल आहे. वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे.

त्यानंतर खेळाडूंनी मैदानावर एक फेरी मारली आणि ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्माने गणपती डान्स करायला सुरुवात केली. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनी सुद्धा नाचायला सुरुवात केली.

रोहित शर्मा खेळाडूंचा होणार सत्कार

गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा आमदार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुंबईचे खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधानभवन प्रांगणात सत्कार करण्याची मागणी केली होती, आणि आज त्यांच्या या मागणीमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानभवनात मुंबईच्या या ४ खेळाडूंचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना हा सत्कार होणार असल्याचे समोर येत आहे.