Table of Contents
भारतीय संघाने काल (गुरुवारी) रात्री टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) उपांत्य फेरीत इंग्लंड संघाला धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तब्बल १० वर्षांनी भारतीय संघ क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघांपैकी एक समजल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाचा पराभव करून टी-ट्वेन्टी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या (Team India) स्टार गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे भारत इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत करू शकला.
यापूर्वी २०२२ साली देखील भारताने उत्तम कामगिरी करत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण, ऑस्भाट्रेलिया संघाकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. एक दिवसीय सामन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीमुळे भारत जिंकेल असे वाटत असतानाच भारताला पराजय स्वीकारावा लागला आणि सर्वांचीच निराशा झाली. पण, कालच्या सामन्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल असे सर्वांना वाटू लागले आहे. असे असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल होतोय. आता तो व्हिडिओ नेमका कोणता घेऊया जाणून:
भारतीय संघाची T20 फायनलमध्ये धडक अन् रोहितला अश्रू अनावर
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात आहेत. तर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा ड्रेसिंग रूमजवळील एका खुर्चीवर बसला आहे. एक-एक करून जसे सर्व खेळाडू आत जात आहेत, त्याचप्रमाणे विराट कोहली (विराट Kohli) सुद्धा जास्त असतो. विराट कोहली थांबतो आणि रोहित शर्माशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण, याचवेळी रोहित शर्मा कमालीचा भावूक होत अश्रू पुसताना व्हिडिओत दिसत आहे.
T20 सामना आणि भारताची अचूक रणनीती
टीम इंडियाचा हा विजय अगदीच नजर लागण्यासारखा होता. भारतीय संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर १७२ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला तोंड देत इंग्लंड संघाला फक्त १०३ धावा करणं शक्य झालं. रोहित शर्माने सामन्यात सलामीला फलंदाजीला येत ५७ धावा करत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ४७ आणि हार्दिक पांड्याने देखील २३ धावा करत भारताला १७२ धावा करण्यात मदत केली. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंड संघाला फार काळ मैदानावर टिकता आले नाही आणि १०३ धावतच त्यांना सामना अटपावा लागला. तसेच उत्तम कामगिरीमुळे अक्षर पटेल (Axar Patel) याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.
Add Comment