Table of Contents
सॅमसंग (Samsung )ही कंपनी भारतातील किंबहुना जगातील काही लोकप्रिय ब्रँड्सपैकी एक आहे. त्यांच्या नवीन प्रॉडक्टची जगभर लोक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि लोकांची हीच प्रतीक्षा संपवण्यासाठी सॅमसंग लवकरच नवे प्रोडक्ट्स लॉन्च करणार असल्याचे समोर येत आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या २४ तारखेला Samsung Galaxy Unpacked Event पार पडणार आहे.
हा इव्हेंट जगभर प्रत्येकाला सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून किंवा मग यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. तसेच इतर काही माध्यमं देखील या इव्हेंटचे लाईव्ह कव्हरेज करणार आहेत. हा सोहळा पॅरिस येथे पार पडणार असून, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये सॅमसंग कंपनी फक्त नवे प्रोडक्ट्सच नाहीत तर तर त्यांच्या नव्या Galaxy AI बद्दल देखील सांगणार आहेत. त्यामुळे या आधुनिकतेच्या युगात सॅमसंग आता नवीन काय आविष्कार आणणार याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली आहे.
Samsung करणार Galaxy – Z सिरीजचे प्रोडक्ट्स लॉन्च
सॅमसंग यंदाच्या कार्यक्रमात नवीन इकॉसिस्टीम प्रोडक्ट्स आणि नवे Z सीरिज प्रोडक्ट्स लॉन्च करणार आहे. या इव्हेंटमध्ये मुख्यत्वे Samsung Galaxy Z Fold 6, Galaxy Z Flip 6, Galaxy Ring, Galaxy Watch Ultra आणि Galaxy Watch 7 हे प्रोडक्ट्स लॉन्च केले जाणार आहेत. तसेच सॅमसंग, Galaxy AI ची काही वैशिष्ट्ये सादर करणार असल्यामुळे या अनपॅक इव्हेंटचे Galaxy AI देखील एक महत्त्वाचे आकर्षण ठरू शकते. Samsung या कार्यक्रमात आपले स्मार्टवॉच Ultra या नावाने देखील लॉन्च करू शकते. Samsung Galaxy Ultra Watch असे सॅमसंगच्या स्मार्टवॉचचे नाव असू शकते. जे Apple च्या Apple Watch Ultra 2 ला टक्कर देईल.
Samsung Galaxy – Z सिरीजचे प्रोडक्ट्स होणार लॉन्च
आगामी कार्यक्रमात सॅमसंग नवे फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, ज्यात Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 चा समावेश असेल. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असेल. हे दोन्ही फोन २५ वॅट फास्ट चार्जिंग आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतील. Samsung Galaxy Z Fold 6 हा निळा, मिंट, पिवळा, चंदेरी, पांढरा आणि काळया रंगात उपलब्ध असेल तर, Galaxy Z Flip 6 गुलाबी, नेव्ही, चंदेरी, पीच, पांढरा आणि काळया रंगात उपलब्ध असेल.
Add Comment