Table of Contents
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत.निवडून आल्यावर आणीबाणीप्रकरणी त्यांनी संसदेत खूप गदारोळ केला. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसला देखील घेरलं. इंदिरा गांधींनी जाहीर केलेली आणीबाणी म्हणजे संविधानाची हत्या असंही ते म्हणाले होते. या संदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी २५ जूनला संविधान हत्या दिवस (Samvidhaan Hatya Diwas) पाळणार असल्याचं घोषित केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Samvidhaan Hatya Diwas गृहमंत्री शहांची घोषणा
अमित शाह यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर म्हटलं आहे की, “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ (Samvidhaan Hatya Diwas) म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.”
आज २७ जून आहे. २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आणीबाणी हा संविधानावर करण्यात आलेल्या सर्वात हल्ल्याचा मोठा आणि काळा अध्याय होता. आणीबाणीमुळे देशात हाहाकार माजला होता. पण, अशा असंवैधानिक घटनांवर तेव्हा विजय मिळवून दाखवला आहे. भारताला प्रजासत्ताकाचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे भारत आणीबाणीविरोधात यशस्वी लढा देऊ शकला. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणाल्या होत्या.
Add Comment