Politics

Sanjay Raut यांची Narayan Rane वर बोचरी टीका

sanjay raut pti
Sanjay Raut यांनी विरोधकांवर साधला निशाणा

सिंधुदुर्गातील मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक आणि सत्ताधारी या मुद्द्यावरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. यावरून आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर निशाणा साधला आहे. हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि यांची मुलं रस्त्यावर विना कपड्याचे नाचले असते.. थयथयाट करत.’ असं म्हणत राऊतांनी (Sanjay Raut) राणेंवर टीकेची झोड उठवली.

‘त्या माणसाला वेड लागलं आहे. मला दुर्दैवाने बोलावसं वाटत आहे. इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला.. मग मोदींच्या काळामध्ये जो पूल कोसळला 150 लोकं मेले मोरबीला.. त्याच्यावर बोला म्हणावं.. नारायण राणे आपण खासदार आहात. आपण एक मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करून बोला.. कोणाची बाजू घेत आहात तुम्ही?’

‘हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं रस्त्यावर नागडी नाचले असती थयथयाट करत… पण आज त्यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार झाला, त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना. तुम्ही तिकडचे खासदार आहात.. तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे, सरकारच्या विरोधात खरे शिवभक्त असाल तर..’

‘तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा… ज्यांनी काम करून घेतलं आणि ज्यांनी पैसे खाल्ले, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार, शिल्पकार बेपत्ता आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा कुठे आहेत ही लोकं. त्यांना विचारा आपटे कुठे आहे?’ असं म्हणत राऊतांनी (Sanjay Raut) राणेंवर टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन आहेत. PWD आणि सरकारने बनवलं होतं. तुमचं सरकार जबाबदार आहे. हे तुमचं पाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाही औरंगजेब करू शकला नाही अफजलखान करू शकला नाही पण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची विकृत मनोवृत्ती त्याच्यामुळे या महाराजांना पराभव पत्करावा लागला.’ अशी टीकाही राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी केली.

बदलापूर मुद्द्यावरून Sanjay Raut यांनी साधला निशाणा…

बदलापूर मुद्द्यावरून Sanjay Raut यांनी साधला निशाणा…

‘बदलापूरची घटना ताजी असताना मालवणमधल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अशा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे आणि फक्त निषेध करून या विषयाची फाईल बंद करता येणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे हे आता उघड झाले आहे.’

‘प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे. हा पुतळा जर पडला असेल तर तो भ्रष्टाचारामुळे. देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत कन्याकुमारीच्या समुद्रात, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत.. रंकाळा तलावामध्ये आहेत. पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत शिखरावर आहेत पहाडावर आहेत प्रतापगडावर आहेत. 120 ताशी किलोमीटर वेगाने वाहतात वारे प्रतापगडावर ते पुतळे जागच्या जागी आहेत. 70-75 वर्षापासून पंडित नेहरू यांनी स्थापना केलेले छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले पुतळे आहेत. पण एक सात महिन्यांमध्ये सिंधुदुर्गचा पुतळा पडतो कसा?’ असा सवालही राऊतांनी (Sanjay Raut) विचारला आहे.