Table of Contents
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नेत्याने कंबर आहे. एकीकडे अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काढली आहे. तर, दुसरीकडे भाजपसुद्धा मॅरेथॉन बैठक घेतंय. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण खूप तापलेलं दिसून येत आहे. पण, यादरम्यान गाजलेला मुद्दा म्हणजे, उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सत्ताधारी आणि इतर विरोधी पक्ष त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
तर यालाच प्रत्युत्तर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे. “मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आजपर्यंत आम्ही पाहिले नाहीत. मात्र, ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल, त्या दिवशी दिल्ली त्यांना पायाशीही उभं करणार नाही”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
काय म्हणाले Sanjay Raut?
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला चांगलं यश मिळालं. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. काल बुलढाण्यात होतो. आज अकोल्यात आहे. या राज्यातील वातावरण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ताबदल होईल. हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीमधून किती उधळपट्टी करत आहे? लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत. त्यांचा १५०० रुपयांचा आकडा आहे. मात्र, पुढे जर आमचं सरकार आलं तर त्यामध्ये भरघोष वाढ होईल. आमच्या नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जात आहे. हा त्रास का दिला जात आहे? तर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला जात आहे. मग तुमचं काय चाललंय?
आमचे आमदार असतील, किंवा आमचे पदाधिकारी असतील आमच्या चौकशा तुम्ही करता का? मात्र, जेव्हा तुमची चौकशी आम्ही करू, तेव्हा तुम्ही सुटणार नाहीत, एवढंच सांगतो. महाराष्ट्रात सावत्र भाऊ कोणीही नाही. जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे सावत्र भाऊ नाही तर ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. त्यांनी जेवढं नुकसान केलं तेवढं गेल्या १०० वर्षात कोणीही केलं नाही.
आताचे मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत. याआधी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, यांच्याएवढा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत. पण ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशीही उभं करणार नाही”, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
Add Comment