Table of Contents
भारतातील अनेक क्रिकेटपटुंनी आतापर्यंत क्रिकेट विश्वातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आता भारतीय पुरुष क्रिकेट संघातील धावांचा पाऊस पाडणाऱ्या आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या दिग्गज खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या सगळ्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याने यासंबंधी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
शिखर धवनने आपण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याच्या त्या व्हिडिओत म्हटले आहे. त्याने पोस्ट केलेल्या १ मिनिट १७ सेकंदाच्या व्हिडिओत त्याने ही माहिती दिली आहे. तसेच त्याने या व्हिडिओमध्ये सर्वांचे आभार देखील मानले आहेत. त्याला क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरू, त्याचे सहकारी, बीसीसीआय, आयसीसी या सर्वांचे आभार मानत त्याने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे.
Shikhar Dhawan ची क्रिकेटमधील कारकीर्द
शिखर धवन हा भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर म्हणून ओळखला जायचा. तो त्याच्या आक्रमक खेळीसाठी संघात प्रसिध्द आहे. त्याच्या आक्रमक खेळीने त्याने आतापर्यंत अनेक गोलंदाजांना घाम फोडला आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे शिखर धवनने (Shikhar Dhawan) अनेकदा सलामी फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय सामने आणि ६८ सामने खेळले आहेत.
२०१० साली त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. २०१० साली त्याला भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरोधात फलंदाजी करण्यासाठी उतरविण्यात आले. पण, त्यावेळी तो फक्त शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर इतर अनेक सामन्यांमधून उत्तम कामगिरी करत त्याने स्वतःला सिद्ध केले. भारताच्या आघाडीच्या अनेक क्रिकेटपटूंच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे भारताच्या इंडियन प्रिमियर लिगमध्येही शिखर धवनने आपली छाप उमटवली आहे. यापूर्वी तो पंजाब किंग्ज कर्णधारसुद्धा होता. आतापर्यंत तो आयपीएलमध्ये एकूण २२२ सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकूण ५१ अर्धशतके तर २ शतके झळकावली आहेत.
Add Comment