Celebrity Entertainment

गायक दिनकर शिंदेंच्या निधनामुळे Shinde कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

DINKAR SHINDE
Dinkar Shinde यांच्या निधनामुळे शिंदे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिंदे घराणे अनेक दशकांपासून महाराष्ट्रात गायनाचा वारसा जपत आले आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर गायल्या गेलेल्या गाण्यापासून भक्ती गीतांपर्यंत अनेक प्रकारची गाणी शिंदे घराण्याने महाराष्ट्राला दिली. प्रल्हाद शिंदे (Prahlad Shinde) यांच्यापासून शिंदे घराण्याच्या गाण्याच्या परंपरेला सुरुवात झाली. पण, शिंदे घरण्यातला असाच एक मोठा आणि प्रसिद्ध गायक हरपल्यामुळे शिंदे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रल्हाद शिंदे (Prahlad Shinde) हे शिंदे घराण्यातील गाजलेले गायक आणि त्यांचाच गायनाचा वारसा पुढे नेणारे आनंद शिंदे (Anand Shinde) यांचे धाकटे बंधू दिनकर प्रल्हाद शिंदे (Dinkar Shinde) यांचे निधन झाले आहे. दिनकर शिंदे यांचा पुतण्या, गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) याने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही माहिती दिली आहे.

दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी आतापर्यंत अनेक प्रकारची गाणी गायली आहेत. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी त्यांच्या आवाजाने भुरळ पाडली आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर रचलेले गीते, कव्वाली, भक्तिगीते यावर त्यांनी गायलेली गीते आजही लोक मोठ्या आवडीने ऐकतात. आनंद शिंदे, दिनकर शिंदे, यांनी शिंदे घराण्याचा गायनाचा वारसा पुढे नेला. दिनकर शिंदे (Dinkar Shinde) यांनी गायलेल्या अनेक गाण्यांचे व्ह्यूज आज लाखोंच्या घरात आहेत. त्याची अनेक गाणी गाजली आणि त्यांच्या कॅसेट्स, सीडीजची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली.

Dinkar Shinde यांच्या निधनाबद्दल काय म्हणाला Utkarsh Shinde?

Dinkar Shinde यांच्या निधनाबद्दल काय म्हणाला Utkarsh Shinde?
Image Source: Loksatta

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर काकांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हणतो, शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला. त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच.तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला.

तुम्हा सर्वांना च्या संस्कारा मुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समरुद्ध करू .तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणा पासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला.दिनू नाना वि विल मिस यू, अशा भावूक शब्दांत उत्कर्षने आपला शोक व्यक्त केला आहे.