Table of Contents
अलीकडच्या काळातील फास्ट लाईफस्टाईल आणि कामाचा ताण यामुळे अनेक लोक आत्महत्या करतात. जगभरात अशी प्रकरणे रोज उघडकीस येत असतात. पण, या तंत्रज्ञानाच्या युगात एखादा रोबोट जो माणसापेक्षा कैक पटीने हुशार समजला जातो, तो आत्महत्या करेल असं कधी वाटलं होतं का? ही बाब जरी धक्कादायक असली तरी खरी आहे.
खरे पाहता, ही घटना दक्षिण कोरियातील (South Korea) या भागातील आहे. इथे घडलेल्या या प्रकारामुळे जगभरातील सर्वांनाच हैराण केलं आहे. पण, एखादा रोबोट आत्महत्या करेल तरी कशी? घेऊया जाणून.
कशी केली South Korea च्या रोबोटने आत्महत्या?
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा हा रोबोट सिटी कौन्सिल इमारतीत कामाला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार, हा रोबोट त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या जिन्याखाली विखुरलेल्या अवस्थेत दिसला. हा रोबोट पडण्याआधी त्याच्या हालचालीत त्यांना काही विचित्र बदल दिसून आले होते. पण तो असा विचित्र का वागतोय? याचं कारण कुणालाच काळात नव्हतं.
ही घटना दक्षिण कोरियातील (South Korea) गुमी शहरात घडली होती. माणसाने नव्हे तर एका रोबोटने केलेल्या आत्महत्येमुळे गुमी शहरातील लोक खूप चिंतित झाले आहेत. तसेच घडल्या प्रकारामुळे गुमी सिटी काउन्सिलने सुद्धा सध्या कामकाजासाठी रोबोट्सची नियुक्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा रोबोट कॅलिफोर्नियातील स्टार्टअप बेअर रोबोटिक्सने बनविला होता. गुमी सिटी काउन्सिलच्या या निर्णयामुळे शहरातील रहिवासी आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच कौन्सिलच्या या निर्णयामुळे भविष्यात यंत्रमानवाचा कितपत वापर केला जाईल, या यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कामाचे दडपण कमी करण्याचे काही मार्ग:
- कामाचे दडपण आल्यास तुम्ही त्याबद्दल तुमच्या मित्राशी बोलू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे निसंकोचपणे मदत मागू शकता. अनेकदा आपल्याला त्रास होतो आणि आपण जर तो कुणाजवळ बोलून दाखवला नाही, तर आपल्याला त्याचा त्रास होतो, त्याचा ताण येतो.
- तुम्ही जर दिवस-रात्र जर फक्त काम एके कामच करत बसलात तर, त्यामुळे सुद्धा तुम्हाला ताण येतो. त्यामुळे कधीतरी कामातून स्वतः साठी पण, वेळ काढा. काम संपवून जर तुम्हाला लवकर जाता येत नसेल, तर काम करत असताना थोडा ब्रेक घ्या. काम करताना कधीतरी एखादे गाणे ऐका किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारा म्हणजे कामाचा तुम्हाला फार ताण येणार नाही आणि तुम्ही जरा फ्रेश राहाल.
- कामाचा तुमच्यावर फारच ताण असेल तर त्याबद्दल तुम्ही एकदा तुमच्या बॉसशी सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटत असेल की यावर बॉसशी बोलून काहीच फायदा होणार नाही तर, असं नाहीये कदाचित यावर तोडगा निघेलही. तुमचा थोडा ताणही कमी होईल.
जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्यावर कामाचा खूप ताण आहे. तुम्ही मानसिकरीत्या तो पेलू शकत नाहीत. तुम्हाला झोप वेळेवर येत नसेल, उगीचच निराश आणि थकल्यासारखे वाटत असेल, चिडचिड होत असेल किंवा फार रडू वैगरे येत असेल, तर ही एखाद्या मानसिक आजाराची किंवा मग अती ताण घेतल्यामुळे शरीराला, मेंदूला होत असलेल्या ताणाची लक्षण असू शकतात. त्यामुळं अशा वेळी एखाद्या सायकोलॉगिस्टकडे जावून योग्य ती ट्रीटमेंट घेण्यास जराही कचरू नका.
तणावामुळे जर तुम्ही मानसिकरित्या खूप खचलेला असाल आणि तणाव तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला असेल तर त्याला हलक्यात घेणे मूर्खपणाचे असते. ज्याप्रमाणे आपलं शरीर मधल्या काळात आजारी पडतं, तसंच आपलं मानसिक आरोग्यही आजारी पडू शकतं. त्यामुळे त्यावर उपचार करण्यात संकोच करू नका. अशावेळी तुम्ही मानसिक आरोग्य तज्ञाकडे जाऊन थेरपी घेऊ शकता.
Add Comment