Entertainment

श्रद्धा कपूरच्या Stree 2 चा ट्रेलर आऊट

Streee d
Stree 2 चा ट्रेलर आऊट

श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या स्त्री (Stree) चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्त्री २ (Stree 2) चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने स्त्री २ (Stree 2) चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल अशी माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिजर लाँच केल्यानंतर आता स्त्री २ (Stree 2) चा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना स्टोरीची हिंट दिली होती. “काळ्या जादू पासून सर्वांची रक्षा करण्याठी मी पुन्हा येत आहे.” या आशयाच्या कॅप्शनसह अभिनेत्रीने दुसऱ्या भागाची कथा काय असेल, ते शेअर केल होते. ‘सरकटे का आतंक, ओ स्त्री रक्षा करना।’ या टॅग लाईननुसार ‘स्त्री 2’मध्ये श्रद्धा सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे, हे स्पष्ट होते. पण ‘सरकटे’च्या भूमिकेत कोण असेल? हे पाहणे रंजक असेल.

Stree 2 मध्ये श्रद्धा कपूरची सकारात्मक भूमिका

स्त्री २ (Stree 2) चित्रपटाची कथा चंदेरी गावाभोवती फिरते. या गावातील लोक चित्रपटाच्या पहिल्या भागात स्त्रीमुळे त्रस्त होते. तर, या भागात ते सरकटे भुतामुळे घाबरून गेल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हे भूत स्त्रीपेक्षाही अधिक भयंकर दाखवण्यात आले आहे. तसेच ट्विस्ट म्हणजे स्त्री अर्थातच श्रद्धा कपूर या सरकटे भूतापासून लोकांचे रक्षण करताना दिसत आहे. त्यामुळे स्त्री २ या चित्रपटात लोक स्त्रीच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करताना सुद्धा दाखवले आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक दृश्य आणि VFX प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारी आहेत. दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) ‘स्त्री २’मध्ये कॅमिओ करणार आहे. चित्रपटात ती एका स्पेशल डान्स नंबरसाठी कॅमिओ करताना दिसणार आहे.

Stree 2 मध्ये श्रद्धा कपूरची सकारात्मक भूमिका
Image Source: Navrashtra

दरम्यान, चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी हे सुद्धा महत्त्वाच्या भुमिकांमध्ये दिसून येणार आहेत. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री 2’ चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

श्रद्धाने हा ट्रेलर शेअर करताना लिहिलं, ‘हा ट्रेलर पाहा, भारतात या गँगची सर्वाधिक प्रतीक्षा करण्यात आली. ती गँग आता आली आहे, चंदेरीमधील भीती संपवण्यासाठी ही गँग लढणार आहे.