Table of Contents
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव पदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकाती ठरल्या आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक (Manoj Saunik) यांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. आज राज्यातील महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण होत असताना ही बातमी समोर आली आहे.
याआधी सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा देखील कार्यभार सांभाळला आहे, आणि त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. २०२५ मध्ये सुजाता या निवृत्त होत असल्याने त्या मुख्य सचिवपदी फक्त १ वर्षासाठी कार्यरत असतील. आज (३० जून) संध्याकाळी त्यांनी माजी मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून सूत्र हाती घेतली.
पती पत्नीने भूषवले एकच पद
सुजाता सौनिक या गेल्या ३ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. सुजाता सौनिक या स्वतः एक वरिष्ठ सनदी अधिकारी असून, निवृत्त सनदी अधिकारी मनोज सौनिक यांच्या त्या पत्नी देखील आहेत. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळला आहे. पती पत्नीने अशा प्रकारे एकाच पदावर नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नितीन करीर यांना त्यांच्या कालावधीत ३ महिन्यांची वाढ करून देण्यात आली होती आणि पुढेही त्यांच्या कालावधीत वाढ होईल असे वाटत असताना, सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी आज निवड करण्यात आली.
रुपाली चाकणकरांनी केले Sujata Saunik यांचे अभिनंदन
महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून या राज्याच्या विकासात राजकीय व्यक्तींच्या बरोबरीने प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांनी आपले बहुमोल योगदान दिले. परंतु राज्याच्या मुख्य सचिव पदी आजवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नव्हती, आज सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पदी एक महिला विराजमान होत आहे, या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे.सुजाता सौनिक यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्र राज्याची जास्तीत जास्त सेवा घडो ही सदिच्छा…!
Add Comment