Table of Contents
फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपूर्ण देशात पावसाने आता जोर धरायला सुरुवात केली आहे. पण, कुठेतरी तुरळक तर कुठेतरी मुसळधार अशा पद्धतीत पाऊस पडत आहे, आणि पावसाच्या अशा स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी बऱ्याच वाढत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे इतर अनेक भाज्यांसह टोमॅटोची भरपूर नुकसान होत आहे. याचा परिणाम पार बाजारातील टोमॅटोच्या किंमतीवर होत आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत एका किलो टोमॅटोची किंमत १२० रुपये आहे. तर, भारतातील इतर काही भागात हीच किंमत १५० पार पोहोचली आहे.
टोमॅटो हा सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या आहाराचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अगदी भाजीपासून सलाडपर्यंत, बिर्याणीपासून सुपपर्यंत सर्वच पदार्थात टोमॅटोचा वापर केला जातो. यापूर्वीही अनेकदा टोमॅटोचे दर वाढले आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना बरेच नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे आता जर टोमॅटोचे दर वाढले तर पुन्हा अनेकांचं बजेट कोलमडणार आहे.
Tomato महागले, खरेदीदार वैतागले
टोमॅटो हा सामान्य नागरिकांच्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे आणि टोमॅटोच्या अशा महागण्यामुळे सामांन्यांच्याही खिश्याला आता कात्री बसणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आता येत्या काळात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले असून बाजारात मागणी असूनही त्याची आवक कमी आहे. तसेच वाहतुकिदरम्यान येणारे अडथळे आणि वाढत्या इंधन दरामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोमॅटोची किंमत वाढून २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या वर्षी देखील काही शहरात टोमॅटोचा दर वाढून २०० रुपयांपर्यंत गेला होता.
सरकार करणार का काही उपाययोजना?
टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहकांमध्ये सरकारबाबत असंतोष पसरला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लवकरच काहीतरी उपाययोजना आणणे गरजेचे आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरांना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांकडून ते विकत घेणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा वाढेल आणि भाव नियंत्रणात राहण्यास मदत होईल. टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे लोकांची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. ज्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळेल.
Add Comment