Table of Contents
नवी मुंबईतील (Navi Mumbai) उरण येथील यशश्री शिंदे (Yashashri Shinde) ही केस महाराष्ट्रात चांगलीच गाजली. याच हत्येप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी हाती आलेल्या पुरव्यांआधारे तपासाला सुरुवात केली. या तपासात त्यांनी आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्ल्यातून अटक केली. यशश्रीची (Yashashri Shinde) हत्या करून तो पनवेलहून कर्नाटकात पळून गेला. तिथून ५ दिवसात पोलिसांनी त्याला अटक केली. यशश्री (Yashashri Shinde)आणि मी अनेक वर्षांपासून संपर्कात होतो, अशी माहिती आरोपीने दिली होती.
पण, आरोपीच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे आता तपासता येणार आहे. तसेच यशश्री (Yashashri Shinde) आणि दाऊदमध्ये काय बोलणं झालं? याचाही छडा लावता येणार आहे. कारण पोलिसांना आता यशश्रीचा फोन सापडला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपण मोबाईलवरुन तरुणीच्या संपर्कात होतो, अशी माहिती आरोपी दाऊद शेखने पोलिसांना दिली आहे. ज्या मोबाईलवरून यशश्री त्याच्याशी बोलायची तो आता पोलिसांच्या हाती लागला आहे. मोबाईल सापडल्यामुळे आता पोलीस तपासाला गती मिळणार आहे. हत्येसाठी दाऊदने वापरलेला कोयता प्रवासादरम्यान फेकून दिला होता, पण पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांना हा कोयता सापडला आहे.
Yashashri Shinde हिने दिला होता लग्नाला नकार?
यशश्रीने लग्नाला नकार दिल्यामुळे खून केल्याचे आरोपीने स्पष्ट केले. यशश्रीच्या वडिलांनी दाऊदच्या विरोधात २०१९ मध्ये पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल दीड महिना तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला अपघातात झालेल्या दुखापतीमुळे तो अंथरुणाला सुमारे दीड महिना खिळून होता. याच दरम्यान त्याने यशश्रीशी पुन्हा संपर्क साधायला सुरुवात केली. यशश्रीच्या वडिलांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला म्हणून त्याने यशश्रीला जीवे मारल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी दाऊदकडे दोघांचे काही अश्लील फोटो असल्याची बाबाही आता समोर येत आहे. हे फोटो कुणी पाहू नयेत अशी यशश्रीची इच्छा होती. पण, तिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्याप्रमाणे त्याने एक फोटो आपल्या फेसबुक खात्यावर टाकलासुद्धा आणि तो डिलीट करण्यासाठी त्याने यशश्रीला भेटायला बोलावले. यशश्री त्याला जाऊन भेटली. पण, त्यांच्यात लग्नावरून बाचाबाची सुरू झाली. यशश्रीने आपल्या मित्राला मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच क्षणी चाकूने सपासप वार करत आरोपीने यशश्रीचा खून केला.
Add Comment