News

तू अशा बातम्या देत आहेस की, Badalapur प्रकरणी नेत्याचे खळबळजनक वक्तव्य…

vaman mhatre 1
शिंदे गटाच्या नेत्याचे Badalapur प्रकरणी खळबळजनक वक्तव्य

तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, असे वक्तव्य बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केले आहे. बदलापूर (Badalapur) येथे घडलेल्या घृणास्पद अत्याचाऱ्याच्या घटनेबद्दल बोलत असताना त्यांनी एका महिला बातमीदाराशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. वामन म्हात्रे यांनी बदलापूर (Badalapur) प्रकरणी केलेल्या या वकव्याचा तीव्र निषेध केला पत्रकारांकडून केला जात आहे. तसेच यावर आता तीव्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

बदलापूर येथे एका मोठ्या आणि नामांकित शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या दोन लहान मुलींवर शाळेच्याच एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून सकाळी साडे सहा वाजता बदलापूर (Badalapur) पूर्व येथे असणाऱ्या या शाळेबाहेर पालक आणि इतर बदलापूरमधील नागरिकांनी आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाने हळूहळू रौद्र स्वरूप धारण केले. बदलापूर (Badalapur) अत्याचाराप्रकरणी शाळेबाहेर आंदोलन सुरू असतानाच, या आंदोलनातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर (Badalapur) रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी रेल्वेसेवा ठप्प केली. तसेच या घटनेचा निषेध पत्रकारांनीसुद्धा लावून धरला आहे.

याच प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधताना बदलपूरचे (Badalapur) माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलत असताना संतापजनक वक्तव्य केले आहे. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, असे वक्तव्य म्हात्रे यांनी महिला बातमीदाराशी बोलताना केले.

वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. तसेच जिल्ह्यातील पत्रकारसुद्धा यावर आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहेत. पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, असे प्रश्न आता विचारले जातायत.

Badalapur प्रकरणी काय म्हणाले वामन म्हात्रे?

Badalapur प्रकरणी काय म्हणाले वामन म्हात्रे?
Image Source: Navrashtra

मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले. मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. – वामन म्हात्रे, शहरप्रमुख, शिवसेना.