Table of Contents
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २८ जुलै पासून हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाला आहे. या शोमध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बिग बॉसच्या घरातील नवनव्या टास्कमुळे (Bigg Boss Marathi Season 5) सर्वच स्पर्धक बेजार झाले आहेत.
पहिल्याच दिवशी बिग बॉसने (Big Boss) घरातील पाणी गायब केलं. तर घरात काही खायला नसल्यामुळे चिडचिड करणाऱ्या स्पर्धकांना आता जमिनीवरही झोपावं लागतंय. वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांच्या चुकीमुळे सर्व स्पर्धकांना जमिनीवर झोपावं लागत असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झाल्याचे दिसून आले.
बिग बॉस मराठीच्या घरात काही काम नसल्यामुळे वर्षा उसगावकर झोपल्या होत्या. पण, त्यांच्या याच झोपण्यामुळे त्यांच्यासह इतर स्पर्धकांना सुद्धा बिग बॉसने एक नवी शिक्षा दिली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोत बिग बॉस ”आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही”. असं म्हणताना दिसत आहेत.
Big Boss मध्ये भिडले स्पर्धक
दुसरीकडे वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) बिग बॉसची माफी मागताना दिसत आहेत. त्यात त्या “चुकून झालं” असं म्हणत असताना. “पण, तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय ना, तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय”, असं निक्की त्यांना बोलताना दिसतेय. त्यावर, ”माझ्या एकटीमुळे नाही”, अस वर्षा उसगावकर म्हणतात. मग त्यानंतर थेट “तुमची अक्कल कुठे गेली होती, जेव्हा तुम्ही झोपला होतात.” असं निक्की वर्षा उसगावकर यांना म्हणताना दिसतेय. निक्कीला शांत करत वर्षाताई म्हणतात,”आरडाओरडा करू नको”. पण, तरीसुद्धा त्यानंतर निक्की तांबोळी शांत बसत नाही, आणि वर्षा उसगावकर यांना उलट उत्तर देताना दिसतेय.
बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी या एकमेकींना भिडताना दिसल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे आता येत्या भागात अजून कोणकोणत्या कारणांमुळे या दोघी एकमेकींशी भांडणार? यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
Add Comment