Table of Contents
सध्या राज्यात निवडणुकांचं वारं वाहत असताना विविध राजकीय पक्षातील नेत्यांचं पक्षांतरणही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच आता पुणे शहरातील चर्चित व्यक्तीमत्व आणि मनसेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More) हे लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात सामील होणार असल्याची बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षात सामील होणारे वसंत मोरे यांनी पूर्वी बराच काळ राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) पक्षात काम केले आहे. पण राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) याच विश्वासू वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवली.
मनसे पक्षातून बाहेर पडताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पण, अखेर ते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या बहुजन वंचित आघाडी पक्षात सामील झाले आणि वंचित आघाडीच्या तिकिटावर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पण या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता ते बहुजन वंचित आघाडी पक्षातून बाहेर पडत, उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नऊ जुलैला वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहेत. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज भेट घेतली आहे आणि भेटीदरम्यान वसंत मोरेंनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत ठाकरेंना सांगितले आहे. त्यामुळे आता ९ जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरे उबाठा गटात प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray आणि वसंत मोरेंच्या भेटीबद्दल काय म्हणले संजय राऊत?
या दोन्ही राजकीय नेत्यांच्या भेटीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी देखील आता वक्तव्य केले आहे. ते म्हणाले कि, भेट घेऊ द्या ना. काय हरकत आहे. ते सामजिक कार्यकर्ते आहेत. एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी लोकसभा निवणूक लढवली होती. त्यांचे पुण्यात सामाजिक आणि राजकीय कार्य चांगले आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत हे खरे आहे. त्यानंतर लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.
मनसेची साथ सोडणारे आता शिवसेनेच्या साथीला
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या दुजोऱ्यामुळे वसंत मोरे यांचा शिवसेना पक्षातला प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. वसंत मोरे हे अगदी मनसे पक्षस्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत होते. परंतु पुणे शहरातील मनसेच्या राजकारणाला कंटाळून वसंत मोरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नात्याने जरी एकमेकांचे भाऊ असले तरी ते राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्या प्रवेशाबद्दल राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Add Comment