Table of Contents
विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवणं हा भारतासाठी खरंच मोठा धक्का होता. सुवर्ण पदकापासून काही पावलं दूर असताना विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. अंतिम फेरीत गेल्यानंतर ठरावीक मर्यादेपेक्षा वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अंतिम फेरीत अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे तिची सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आता हुकली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिचं वजन २ किलो वजन जास्त असल्याचे समोर आले आहे. वजन कमी करण्यासाठी विनेशने खूप प्रयत्न केले. इतकच नाही तर तिने तिचं रक्त देखील काढलं. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही.
सेमीफायनलमध्ये खेळत असताना विनेश फोगाट हिचं वजन जवळपास ५२ किलो होतं. सेमीफायनलनंतर आराम न करता विनेशने जास्तीच वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यासाठी ती रात्रभर जगली. आपलं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तिने, रात्रभर सायकल चालवली, दोरीच्या उड्या मारल्या, तिने आपली नखं कापली, केस कापले, इतकंच नव्हे तर विनेश फोगाट हिने वजन कमी व्हावं याकरिता आपल्या शरीरातून रक्त देखील काढलं. इतक्या प्रयत्नानंतर तिचं वजन ५० किलो १५० ग्रॅम एवढं झालं होत.
विनेश फोगाट हिच्यासोबत या आधीसुद्धा असा प्रकार घडला आहे. २०१६ च्या ऑलिम्पिक आशियाई क्वालीफायरमध्येही विनेश फोगाटसोबत असंच काहीसं घडलं होतं. ४८ किलोग्रॅम वजनी गटात शेवटच्या क्षणी विनेश फोगाट हिला वजन कमी करता आलं नव्हतं. त्यावेळी तिला घाम येणं पण बंद झालं होतं. त्यामुळे आता आपलं वजन कमी होणार नाही, हे तिला कळून चुकलं होतं. यावेळी सुद्धा तिने सेमीफायनलमध्ये आल्यापासून तिने वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. कमी कॅलरीजच्या पदार्थांचे सेवन करणे, सौना बाथ घेणं, सायकलिंग करणे, असे बरेच प्रयत्न तिने केले. शरीरात पाणी राहू नये म्हणून तिने पाणी पिणेसुद्धा बंद केले होते.
Vinesh Phogat ला अपात्र ठरवणारा नियम नेमका आहे काय?
कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटूंना १०० ग्रॅम ज्यादा वजनाची मुभा दिली जाते. म्हणजे जर विनेशचं वजन ५० किलो १५० ग्रॅम ऐवजी ५० किलो १०० ग्रॅम असतं तर तिला अपात्र ठरवलं गेलं नसतं. कुस्तीत कुस्तीपटूंचं वजन सामन्याआधी पडताळून पाहिलं जातं. तसेच कुस्तीपटूंचं जे वजन असतं ते त्यांना दोन दिवस तरी त्याचं कॅटेगिरीत कायम ठेवावं लागतं. पण, विनेश फोगाट हिचं वजन ५२ किलोपर्यंत गेलं होतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही तिचं थोडं वजन जास्त भरल्याने अखेर तिला अपात्र ठरवण्यात आलं.
Add Comment