Table of Contents
बदलापूर (Badalapur) येथे घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची निंदा करावी तितकी कमीच आहे. या घटनेकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. मुद्दा फारच तापल्यानंतर यावर जलद गतीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग (Arti Singh) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून बदलापूर बलात्कार प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले.
तसेच या घटनेचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या खटल्याचे विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही प्रतिक्रिया समोर येत आहे.
Badalapur प्रकरणी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणी (Badalapur) प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलिस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”
संवेदनाहीन विरोधी पक्ष केवळ राजकारण करीत आहेत
अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधक करीत असून, तो दुर्दैवी आहे. संवेदनाहीन विरोधी पक्ष केवळ राजकारण करीत आहेत. माजी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणे, हे त्यांना शोभत नाही. अशाप्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्या मुलींना न्याय देणे याला प्राधान्य आहे. आंदोलकांमध्ये कोण आहेत, यावर या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूरच्या घटनेत (Badalapur) प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दुपारी दिले. तसेच या घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Add Comment