Table of Contents
राज्यात सरकार सध्या नवनवीन योजना लागू करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला केंद्रित अनेक योजनांची राज्यात घोषणा करण्यात आली. अलीकडेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती.
राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला, आणि रक्षाबंधनाच्या आधी राज्यातील बऱ्याच महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये जमा झाले. पण, लाडकी बहिण योजनेनंतर (Ladki Bahin Yojana) आता अजून एक नवी योजना लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना ( Lakhpati Didi Yojana). या योजनेच्या माध्यमातून महिलांना जवळपास ५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. तसेच राबवल्या जाणाऱ्या या लोकल्याणकारी योजनांमध्ये अलीकडच्या काळात महिला सशक्तिकरणाच्या योजनांवर भर देण्यात येत आहे. महिलांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी ही या मागची मूळ संकल्पना आहे. सरकारकडून राबवली जाणारी लखपती दीदी योजना ( Lakhpati Didi Yojana) ही अशीच योजना आहे, जी महिलांसाठी राबवली जाते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. उद्योग क्षेत्रातील महिलांचे योगदान वाढावे म्हणून ही सुरू करण्यात आली. तसेच या योजनेंतर्गत
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
लखपती दीदी योजना ( Lakhpati Didi Yojana) ही मुख्यत्वे बचतगटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करता यावी म्हणून सुरू करण्यात आली होती. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि त्यांच्यासाठी स्वयं रोजगार निर्माण व्हावा, हा लखपती दीदी योजनेमागचा ( Lakhpati Didi Yojana) हेतू होता. एकूण ३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. एक लाखापासून पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेच्या माध्यमातून महिलांना दिले जाईल.
Lakhpati Didi Yojana अटी व अर्ज प्रक्रिया…
लाडकी बहिण योजनेप्रमाणे या योजनेच्या पण काही अटी आहेत, ज्या अर्जदार महिलेला पूर्ण करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलेच्या घरातील एकही सदस्य शासकीय नोकरदार असता कामा नये. तसेच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असायला हवे.
लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यानंतर उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवावा लागतो. मग त्या आदाखड्याची पडताळणी झाल्यावर आणि अर्जदार महिला जर योजनेसाठीच्या सर्व अटींची पूर्तता करत असेल तर, महिलेला केंद्र सरकार लखपती दीदी योजनेमार्फत ( Lakhpati Didi Yojana) ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करेल.
Add Comment