Politics

आता उद्धव ठाकरेंना काय म्हणाले Prithviraj Chavan?

images 1522164470046 prithviraj chauhan 202307578806
उद्धव ठाकरेंच्या भेटीवर Prithviraj Chavan यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला तो फक्त मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून, अशी टीका सातत्याने विरोधी पक्षातील नेते करत आहेत. दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री पदावरून बोलणं झालं, असं म्हटलं जातंय. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी केलेला दिल्ली दौरा, राहुल गांधींची घेतलेली भेट यामागे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं आणि त्या अनुषंगाने निवडणुका लढाव्यात ही होती अशी चर्चा आहे. अशात आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी या सगळ्यावर परखड भाष्य केलं आहे.

काय म्हणाले Prithviraj Chavan?

काय म्हणाले Prithviraj Chavan?
Image Source: Pune Mirror

२०१४ आणि २०१९ मध्ये खूप वाईट परिस्थिती होती. काही तात्कालीन चुका झाल्या, परिस्थिती अशी होती आम्हाला कमी जागा मिळाल्या. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की काँग्रेसची ताकद शून्य झाली. मात्र २०२४ च्या निवडणुकीत मी महत्त्वाचा फॅक्टर हा मानतो की वंचितने यावेळी आमचं नुकसान केलं नाही. बायपोलर लढाई अनेक ठिकाणी झाली.

इंडिया आघाडीची निर्मिती झाल्याने समोरासमोर निवडणूक झाली. इतर राज्यांत आणि महाराष्ट्रात ते घडलं. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावेळी मतविभाजन झालं नाही त्यामुळे आम्हाला जागा जिंकता आल्या. लोकसभेच्या अपयशाचं श्रेय हे मोदींना बऱ्याच प्रमाणात दिलं पाहिजे. कारण त्यांनी अल्पसंख्याकांना टार्गेट केलं. त्यामुळे ती मतं आमच्याकडे आली. असंही पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी म्हटलं आहे.

संविधान बचाओचा मुद्दा निवडणुकीत होता ज्याला आता देवेंद्र फडणवीस फेक नरेटिव्ह म्हणत आहेत. पण हा मुद्दा सुरु कुणी केला? यातच त्याचं उत्तर आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभेत ४०० पारचा नारा दिला होता. तसंच संविधान बदलायचं हे त्यांचेच खासदार म्हणाले. त्यामुळेच दोन तृतीयांश बहुमत हवं होतं. तो मुद्दा लोकांच्या मनात गेला. फेक नरेटिव्ह नव्हतं ते भाजपाने सुरु केलं होतं जे त्यांच्या अंगलट आलं.

शिवाय महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे सगळं घडलं होतंच. निवडून आलेल्या सरकारला पाडण्यात आलं ते लोकांना आवडलं नाही. सत्ता वापरुन आणि नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातले आमदार पळवले. त्यानंतर सत्तांतर झालं तो रागही लोकांच्या मनात होता असंही पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी म्हटलं आहे. ‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी अशा बऱ्याच गोष्टींबाबत वक्तव्य केली.

महाविकास आघाडीत जरा ताणलं गेलं होतं. सांगलीच्या बाबतीत जर आम्ही ताणलं असतं तर तुटलं असतं. दिल्लीतून आम्हाला सांगण्यात आलं होतं की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी फुटू देऊ नका. त्यामुळे एखादं पाऊल आम्ही मागे घेतलं आणि आघाडी मजबूत ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेससह भिवंडीच्या जागेवर वाद झाला. सांगलीची जागा आमची होती. आम्ही तिथे तडजोड केली असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या निवडणुकीलाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरं जात आहोत. पण महायुतीबाबत साशंकता आहे. कारण अजित पवारांना का घेतलं हा प्रश्न आहेच. त्यामुळेच टीका झाली. असे पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला. महाराष्ट्राची एक परंपरा आहे की विरोधी पक्षाची आघाडी असते तेव्हा काँग्रेस कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत नाही. हे महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही आहे. मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उतरले तर गोष्ट वेगळी असते. काँग्रेसची परंपरा आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. आता उद्धव ठाकरेंना का गरज वाटली? की आपण जाऊन मुख्यमंत्रिपदाचं शिक्कामोर्तब करुन यावं? लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा परफॉर्मन्स खूप समाधानकारक नव्हता.

उद्धव ठाकरेंनी काय चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू शकतो. त्यामुळे पुन्हा सावरण्यासाठी गेले होते का? काँग्रेस पक्षात आता त्यांची ही मागणी कुणी ते मान्य करणार नाही. सहानुभूतीचा विषय आता संपला आहे. आता राग आहे तो पक्षांतर केलं त्यांच्याबद्दलचा. त्यांच्या मतदारांचा हा प्रश्न असेल की आम्ही विश्वासाने निवडून दिलं आणि तुम्ही त्याचा सौदा का केला? असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी ( Prithviraj Chavan ) फुटलेल्या आमदारांना लगावला आहे.

About the author

Pradnya Mestri

Add Comment

Click here to post a comment