Table of Contents
‘बिग बॉस मराठी’चा (Big Boss Marathi) पाचवा भाग हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत चालला आहे. या सिझनचा विकेंडचा वार हा भाऊचा धक्का म्हणून ओळखला जातो. ‘बिग बॉस मराठी’चा (Big Boss Marathi) दुसरा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने काही स्पर्धकांचे कौतुक केले. तर काहींना खडे बोल देखील सुनावले आहेत. जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, वैभव, निक्की या स्पर्धकांची रितेश देशमुखने (Riteish Deshmukh ) चांगलीच शाळा घेतली.
तर, सूरज चव्हाण आणि योगिताच्या सुधारत असलेल्या खेळाच्या शैलीचे त्याने कौतुक केले. पण यावेळी. बिग बॉस मराठीतील (Big Boss Marathi) खेळाडू आणि अभिनेत्री योगिता हिला अश्रू अनावर झाले. तसेच तिने रितेश देशमुखसमोर शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली. जीव माझा गुंतला या मालिकेत तिने अंतराची भूमिका साकारली होती. तर याच मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशी तिने लग्न केले. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या (Big Boss Marathi) घरात पार पडलेल्या कॅपटनसीच्या टास्कसंदर्भात त्याने संतप्त पोस्ट केली होती.
सौरभने त्याच्या या पोस्ट बिग बॉसमधील (Big Boss Marathi) काही कलाकारांवर आक्षेप घेतला होता. ‘लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते. खरंच हा फॅमिलीसोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?’, असा प्रश्न त्याने या पोस्टमधून विचारला होता. अभिजित आणि अंकिता यांनी कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या फेरीत विजय मिळवल्यामुळे जान्हवी आणि अरबाज त्यांच्यावर खूप संतापले आणि त्यांबद्दल अपशब्द वापरले. तर आर्यानेसुद्धा निक्की आणि जान्हवीवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. या दरम्यान घरात खूप भांडणं झाली. तसेच विरोधी गटाने वापरलेल्या अपशब्दांवर वर्षा उसगांवकर यांनीसुद्धा आक्षेप घेतला.
Big Boss Marathi च्या भाऊच्या धक्क्यावर काय घडले?
भाऊच्या धक्क्यावर रितेशने योगिताचं कौतुक केलं आणि तिला अश्रू अनावर झाले. तेव्हा ती रडत म्हणाली की, “मला माहीत नाही की मी कशी खेळतेय? पण मला इथे नाही राहायचंय. माझी चूक झाली, मी इथे आले. मी इथे यायलाच नको होतं. मला हे सहन होत नाही. मी इथे नाही राहू शकत. मला घराबाहेर पडायचंय. मला हा खेळ सोडायचा आहे.” योगिताच्या या मागणीवर रितेश म्हणाला की, “इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही, हे मी नाही ठरवू शकत. हे जनता आणि बिग बॉसच (Big Boss Marathi) ठरवणार. तुम्हाला असं का वाटतंय माहीत नाही. पण तुम्ही चांगलं खेळताय.”
Add Comment