Table of Contents
बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिॲलिटी शोचा ५ सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावेळी हा शो चक्क महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नाही तर रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) होस्ट करणार आहे. बिग बॉस मराठीचा (Big Boss Marathi) पाचव्या पर्वाची सुरुवात २८ जुलै रोजी कलर्स मराठी वाहिनीवर (Colors Marathi) वाहिनीवर होणार आहे. पण, या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून नक्की कोण सहभागी होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पण, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना आता येत्या २८ तारखेला मिळेल.
पण, या सर्व चर्चांच्या दरम्यान आता एक नवी माहिती समोर येत आहे. या माहितीनुसार, अंकिता वालावलकर, चेतन वडनेरे, विवेक सांगळे ही नावं बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi) नव्या पर्वात दिसण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच दुनियादारी चित्रपट फेम कलाकार सुद्धा आता बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi) पाचव्या भागात दिसून येईल असेही म्हंटले जात आहे. या चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत, आणि कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे ती पोस्ट?
Instagram वर ही पोस्ट पहा
बिग बॉसच्या पहिल्या पर्वात याआधी सुशांत शेलार (Sushant Shelar) सहभागी झाला होता, जो दुनियादारी. या चित्रपटाचा भाग होता. कलर्स मराठी वाहिनी पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, दोस्तीच्या दुनियेतील यार, एक नंबर कलाकार कोण आहे हा? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात नेमकं कोण येणार? या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
Big Boss Marathi च्या नव्या पर्वात दिसणार ‘हे’ कलाकार?
महेश कोठारे यांच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत या मालिकेतून अलीकडेच वर्षा उसगांवकर यांनी एक्झीट घेतली. बिग बॉसचं नवं पारव सुरू होण्यापूर्वी त्यांनी निर्णय घेतलाय. त्यामुळे वर्षा उसगांवकर आता बिग बॉसमध्ये दिसणार का? असा प्रश्न चाहते त्यांना विचारत आहेत.
तसेच, कोकणी भाषा, कोकणाशी संबंधित कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवणारी अंकिता वालावलकर सुद्धा आता बिग बॉसच्या नव्या पर्वात दिसेल अशा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ झाला आहे. त्यामुळे आता हे दोघेही बिग बॉसच्या घरात दिसणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
Add Comment