Table of Contents
एखादया देशातील लोकसंख्या किंवा एखाद्या देशातील मनुष्यबळ हा त्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा असा घटक आहे. अलीकडच्या काळात चीन आणि भारतासारख्या देश कुठेतरी आपली लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जपानसारखे देश विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या देशातील लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
जागतिक लोकसंख्या दिन हा दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक स्थरावर साजरा केला जातो. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्याच्याशी संबंधीत आव्हानांची जाणीव करून देण्यासाठी, तसेच लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी साजरा केला जातो.
२०२३च्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या जवळपास १.४ इतकी आहे. तर २०३० पर्यंत ती झपाट्याने वाढून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशापेक्षा म्हणजेच चीनपेक्षासुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा देश जरी जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी भारत लवकरच त्याला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल यात शंका नाही. त्यामुळे जागतिक लोकसंख्या दिनाच्या निम्मिताने हा दिवस साजरा करणं का महत्त्वाचं आहे, घेऊया जाणून…
World Population Day चा इतिहास
दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लोकसंख्येचा विस्फोट, समानता आणि लोकसंख्या वाढीसंबंधी समस्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मुख्यत्वे हा दिवस साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे १९८९ साली करण्यात आली होती.
१९८७ पर्यंत जगाची लोकसंख्या ५ अब्जांच्या जवळपास पोहोचली आणि त्यामुळे प्रत्येक देशाला याबद्दल चिंता वाटू लागली. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाकडे आणि त्यासंबंधीच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ११ जुलै ही लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित केली.
World Population Day ची उद्दिष्ट:
- लोकसंख्या विस्फोट आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संसाधन कमतरता, पर्यावरण प्रदूषण, जीवनस्तरातील घट अशा समस्यांकडे लक्ष वेधून घेणे.
- लोकसंख्या नियंत्रण आणि त्यासंबंधी महिलांची भूमिका या बाबत जागृती करणे.
- जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा अजून एक महत्तवाचा उद्देश म्हणजे माता आरोग्य आणि शिशु आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे, तसेच योग्य आणि उत्तम आरोग्य सेवांच्या मदतीने माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा देखील आहे.
Add Comment