Table of Contents
मीरा-भाईंदरमधील (Mira Bhayandar) सर्वसामान्य नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूककोंडीच्या समस्येला तोंड देतेय. मात्र आता त्यांचा हा प्रश्न सुटणार आहे. कारण अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मेट्रो 9 चे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे, तर दुसरीकडे दक्षिण मुंबई आणि उपनगरांदरम्यान बनवण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचा विस्तार भाईंदरपर्यंत (Mira Bhayandar) करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. .
दहिसर चेकनाका ते सुभाषचंद्र बोस मैदान अशी मेट्रो-9 ची सेवा लवकरच सुरू होणार आहे. दहिसर ते भाईंदर धावणारी ही मेट्रो दोन टप्प्यात सुरू केली जाऊ शकते. सध्या मेट्रो-9 चे 87 टक्के काम पूर्ण झालेय. 2019 मध्ये मेट्रोच्या कामाची निविदा काढण्यात आली तेव्हा 2022 पर्यंत मेट्रो सुरू करण्याचे नियोजन होते. कोरोना महामारी आणि इतर कारणांमुळे आता डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो पूर्णपणे सुरू केली जाईल.
दहिसर ते भाईंदर पश्चिम हा मेट्रो मार्ग 10.41 किमी लांबीचा असून त्यात 8 स्थानके असतील. ही मेट्रो पूर्णपणे एलिव्हेटेड असणारे. वाढती लोकसंख्या आणि रहदारी लक्षात घेऊन मेट्रोच्या खाली हटकेश ते गोल्डन नेस्ट सर्कलपर्यंत तीन उड्डाणपूल बांधले जात आहेत. यापैकी हाटकेश ते साईबाबा नगर हा उड्डाणपूल तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2024 पर्यंत दहिसर ते काशिगावपर्यंत मेट्रो-9 (Mira Bhayandar) सुरू करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर 2025 पर्यंत काशीगाव ते सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.
Mira Bhayandar मध्ये होणार कोस्टल रोड…
मेट्रोनंतर भाईंदर (Mira Bhayandar) शहरापर्यंत एक्सटेन्ड करण्यात येणाऱ्या कोस्टल रोडमुळे देखील मीरा-भाईंदरची वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणारा कोस्टल रोड आता भाईंदरपर्यंत (Mira Bhayandar) एक्सटेन्ड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा रोड शहराच्या संपूर्ण वेस्टर्न लाईनला कव्हर करणार आहे . या रस्त्याच्या विस्ताराबाबत पीयूष गोयल यांनी बीएमसी अधिकाऱ्यांशी चर्चा केलीय, तर यासोबतच त्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशीही रस्त्याच्या मंजुरीबाबत चर्चा केली असून, 23 ऑगस्टपर्यंत पर्यावरण मंजुरीचा अहवाल येईल, असे त्यांनी सांगितलेय. 14 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रस्ता थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे.
प्रशासनाच्या या नव्या प्रकल्पांमुळे मीरा-भाईंदरची वाहतूककोंडीची समस्या खरोखरच सुटते का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Add Comment