Table of Contents
उरणमधील हत्येप्रकरणी रोज नवी अपडेट समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात २२ वर्षीय यशश्री शिंदे (Yashashri Shinde) हीची २५ जुलै रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर २७ जुलै रोजी संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, आणि त्यानंतर आरोपी दाऊद शेख (Daud Sheikh) याला कर्नाटकातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आपणच गुन्हा केल्याचे त्याने स्पष्ट केले आहे आणि याप्रकरणी आता त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आरोपीविरोधात यशश्रीच्या पालकांची अत्यंत संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण फॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या. सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल. पण त्याला फाशी दिलीच पाहिजे”, असं यशश्रीच्या (Yashashri Shinde) आईने सांगितलं.
“प्रशासनाने या प्रकरणात कडक कायदा तयार केला पाहिजे. निर्भया प्रकरण झाल्यानंतर सरकारला जाग आणि कायदे तयार केले गेले. पण असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कायद्यात कठोर तरतूद केल्या पाहिजे”, अशी मागणी यशश्रीच्या वडिलांनी (Yashashri Shinde) केली आहे.
Yashashri Shinde हत्येचा घटनाक्रम
यशश्री शिंदे (Yashashri Shinde) हीची २५ जुलै रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. २६ जुलैला तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर २७ जुलै रोजी संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी 2 ते 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नवी मुंबई आणि कर्नाटकात शोध सुरू केला. त्यानंतर कर्नाटकातून दाऊद शेखला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात मोहनीस नावाच्या मुलाचे नाव समोर आले होते. पण, त्याने खून केला नसल्याचे आता समोर येत आहे. मात्र, दाऊद जो यशश्रीच्या संपर्कात नव्हता आणि ज्याने यशश्री शिंदेचा खून केल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने नेमकं हे सगळं कसं घडवून आणलं? याचा शोध पोलीस घेत आहेत.
Add Comment