Table of Contents
बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व यंदा खूपच गाजत आहे. याच पर्वात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) हिनेही सहभाग घेतला होता. तिला प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा देखील मिळत होता. पण, घरातील भांडणं, वाद, मानसिक ताण याला कंटाळून योगिताने (Yogita Chavan) बिग बॉसकडे घरी जाण्याची मागणी केली. तिने अलीकडेच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांचा निरोप घेतला. याबद्दल राजश्री मराठीशी योगीताने (Yogita Chavan) संवाद साधला.
योगिता (Yogita Chavan) म्हणाली की, “प्रेक्षक मला एवढा सपोर्ट करतील हे मला खरंच माहिती नव्हतं. पण, एलिमिनेट झाल्यावर मी बाहेर आले आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या. माझ्या विरोधात एकही कमेंट ट्रोल करणारी नव्हती आणि यासाठी मी सदैव ग्रेटफुल आहे. मी ‘बिग बॉस’चा प्रचंड आदर करते कारण, त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. अनेकदा माझी समजूत काढली आणि मी सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न केले. हा गेम खूप जास्त उत्सुकता वाढवणारा आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी एक वेगळं टॅलेंट लागतं. कारण, आत राहणं खरंच खूप अवघड आहे. माझी एवढीच इच्छा आहे की, टीम ‘बी’ पैकी कोणीतरी जिंकलं पाहिजे आणि मला खात्री आहे की, त्यांच्यापैकीच कोणीतरी जिंकेल. मला खूप गोष्टी आतमध्ये शिकायला मिळाल्या आणि भावनिकदृष्ट्या मी खंबीर झाले.”
जान्हवीबद्दल काय म्हणाली Yogita Chavan?
घरात स्पर्धकांचे मानसिक आरोग्य बिघडवण्यासाठी कोण जबाबदार आहे? असे विचारले असता. योगिता म्हणाली की (Yogita Chavan), “निक्कीपेक्षा जास्त जान्हवी जबाबदार आहे असं मला वाटतं. खरंतर जान्हवीने मला वैयक्तिकरित्या काहीच त्रास दिलेला नाही. पण, जान्हवीला मी बाहेर याआधी भेटले होते ती आत अशी का वागतेय मला खरंच माहिती नाही. केवळ गेमसाठी ती हे सगळं करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण, तिचं असं वागणं कोणालाही आवडत नाहीये. मी आणि पॅडी दादांनी तिला समजवलं होतं…ती अत्यंत चुकीचे शब्द वापरते. लायकी काढते. कोणताही गेम एवढा महत्त्वाचा नसतो की, आपण एखाद्याला टोकाचं बोलू शकतो. घरात वर्षा ताईंना खूप जास्त टार्गेट करण्यात आलं. पण, त्यांनी गोष्टी खूप संयमाने हाताळल्या याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे. खरंतर तेवढा कणखरपणा प्रत्येकामध्ये आला पाहिजे.”
योगिता ही जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने साकारलेले अंतराचे पात्र लोकांच्या पसंतीस पडली. त्यानंतर तिने मालिकेतील मल्हार म्हणजेच सौरभ चौघुलेशी लग्न केले आणि लग्नाला पाच महिने होताच तिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.
Add Comment