भारतात लवकरच आयपीएल (IPL) सामना सुरु होणार आहे. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी म्हणजे टीम इंडीयाला वर्ल्ड कप (world cup) जिंकून देणारा युवराज सिंग (Yuvraj Singh) आयपीएलमधून पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंग (Yuvraj Singh) खेळाडू म्ह्णून नाही तर, गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आयपीएलमध्ये दिसणार आहे. गुजरात टायटन्सचे विद्यमान प्रशिक्षक आशिष नेहरा आणि संचालक विक्रम सोलंकी हे येत्या आयपीएल (IPL) स्पर्धेआधी संघ सोडणार असल्याचे समोर येत आहे.
जानेवारी 2022 पासून आशिष नेहरा गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून जेते पदावर स्वतःचे नाव कोरले आहे. त्यानंतर आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर, २०२४ मध्ये हार्दिक पंड्याने पुन्हा मुंबई इंडियन संघात प्रवेश केल्यानंतर गुजरात संघाची कामगिरी खालावताना दिसली. हार्दिक पंड्यानंतर गुजरात संघाची जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पण, त्यादरम्यान संघाला फक्त 5 सामन्यात विजय, तर 7 सामन्यात पराभव स्वीयकारावा लागला. २०२४ सालच्या आयपीएल (IPL) स्पर्धेत गुजरात संघाला गुणतालिकेत आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Yuvraj Singh स्वीकारणार प्रशिक्षक पद?
२०२५ साली आयपीएल (IPL) मेगा लिलावा होण्यापूर्वी आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी हे दोघेही संघ सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाच्या व्यवस्थापनाने युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे जर युवराज सिंग (Yuvraj Singh) प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला, तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. युवराज सिंग (Yuvraj Singh) हा भारतीयांच्या मनावर राज्या केलेला आणि या फॉरमॅटचा दांडगा अनुभव असलेला एक खेळाडू आहे, आणि त्यात जर त्याने गुजरात संघाने त्याला दिलेली ऑफर स्वीकारली तर त्याला मोठी रक्कमही यासाठी मिळू शकते. गुजरात टायटन्स आशिष नेहराला एका पर्वासाठी 3.5 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च होता. त्यामुळे आता युवराज सिंगला पण त्यांच्यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या (IPL) सुरुवातीला युवराज सिंग हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला होता. तर युवराज सिंगने आयपीएलमध्ये १३२ सामन्यांमध्ये एकूण २७५० इतकया धावा केल्या आहेत. ज्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज सिंग आतापर्यंत पंजाब, हैदराबाद, पुणे वॉरियर्स, आरसीबी, मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तर एकट्या युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल १६ कोटी मोजले होते. तर, आता येत्या आयपीएल (IPL) सामन्यात खरंच युवराज सिंग गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
Add Comment